Internet of People (Marathi)

आजकाल आपण सर्वचजण इंटरनेटच्या मदतीने चालणाऱ्या सेवा अथवा इंटरनेटवर आधारित विविध प्रकारची उपकरणे सहजरित्या वापरतो. या सगळ्या सेवा आणि उपकरणे इंटरनेटच्या माध्यमातून आश्चर्यकारक सहजतेने एकमेकांशी ‘संवाद’ साधतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे ‘टास्क’ पार पाडतात. या सगळ्या सेवा, उपकरणे आणि त्यांना जोडणारे इंटरनेटचे महाजाल, या सगळ्याला ‘Internet Of Things- IoT’ या नावानी ओळखलं जातं.

‘Internet Of Things- IoT’ वर आधारित सेवा आणि उपकरणे यांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ‘सेन्सर्स ‘ वापरले जातात आणि हे सेन्सर्स त्यांच्या अपेक्षित कामानुसार वेगवेगळ्या प्रकारचे ‘अलर्टस’ पाठवतात.
सोप्या भाषेत उदाहरण सांगायचं तर, वाढलेल्या तापमानासाठी “मला उकडतंय” ही जाणीव एक मानवी सेन्सर आहे असा गृहीत धरलं तर वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेऊन तापमान नियंत्रण उपकरण अथवा यंत्रणेला ‘अलर्टस’ पाठवून कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तापमान नियंत्रित होणे हा या सगळ्या ‘Internet Of Things- IoT’ वर आधारित सेवा आणि उपकरणे यांचा अद्भुत इफेक्ट आहे. आणि हळूहळू आपल्याला या सगळ्या अद्भुत इफेक्टची ओळख आणि सवयही होते आहे.

या सेन्सर्सचं वैयक्तिक रूप म्हणजे आजकाल उपलब्ध असणारी वेगवेगळी “छोटी उपकरणे – Wearables” जी तुम्ही मनगटावर बांधू शकता, गळयात अडकवू शकता अथवा पर्समध्ये, खिशात ठेवू शकता.

आजकाल बाजारात सहजपणे उपलब्ध असणारी काही Wearables, Emergency Alert devices म्हणून विकली आणि वापरली जातात. म्हणजे,असं एखादं Wearable तुमच्या जवळ असेल, आणि तुम्ही एखाद्या इमर्जन्सीमध्ये सापडलात, तर केवळ एक बटण दाबून तुमच्या कुटुंबियांना तुम्ही इमर्जन्सीमध्ये असल्याचा अलर्ट जाऊ शकतो. तर ही Wearables आणि त्यांचा वैद्यकीय अथवा इतर कोणत्याही इमर्जन्सी मध्ये होऊ शकणारा वापर याचा विचार केला तर काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

१. असं कोणतंही छोटं उपकरण बॅटरी, सेल अथवा चार्जिंग करून चालू असणं गरजेचं आहे.
२. हे Wearable जवळ बाळगण्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
३. अजूनही सर्वसामान्यांना परवडेल अशा किमती नसल्यामुळे तेवढा खर्च करण्याची तयारी असली पाहिजे.
४. बहुतेक Wearable मोबाईल फोनच्या ब्लुटूथ ला जोडली असल्यामुळे, मोबाईल फोनचे ब्लुटूथ सतत चालू ठेवले पाहिजे, ज्याच्यामुळे अर्थात मोबाइलचे चार्जिंग लवकर संपते.
५. ज्या कोणाजवळ असे एखादे Wearable असेल, त्यांना इमर्जन्सीमध्ये बटण दाबायचे सुचले पाहिजे अथवा ती व्यक्ती इमर्जन्सीमध्ये बटण दाबायच्या परिस्थितीमध्ये असली पाहिजे.

याचा अर्थ असा की अशा Wearable च्या बाबतीत वर नमूद केलेल्या काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात आणि तुमचा मोबाइल अथवा तुमच्याकडे असणारे Wearable Emergency Alert device दोन्ही पैकी एक जरी तुमच्या जवळ नसेल किंवा चालू नसेल तर तुम्हाला अपेक्षित उपयोग होणार नाही.

दुर्दैवाने एखाद्या अपघाताच्यावेळी मोबाईल फोन अथवा तुमच्या Wearable Emergency Alert device चे नुकसान झाले तरी अपेक्षित उपयोग होणार नाही.

मग यासाठी एखादा पर्याय आहे का? आहे.

QR Code वर आधारित Emergency ID – ‘Internet Of People- IoP’ प्रणाली

एक अशी Emergency ID प्रणाली जी वापरण्याकरिता कोणत्याही उपकरण अथवा विशिष्ठ सॉफ्टवेअर वर अवलंबून नाही. जी एखाद्या इमर्जन्सी मध्ये तुमच्या कुटुंबियांना अथवा एखाद्या Emergency Service ला संदेश देऊ शकते.

१. जिला कोणतीही बॅटरी अथवा चार्जिंग लागत नाही
२. एकाच किट मध्ये Emergency ID चे एकापेक्षा जास्त पर्याय देते.
३. कुटूंबियांबरोबरच्या एकवेळच्या हॉटेलिंग पेक्षाही कमी किमतीत मिळते
४. जी तुमच्या फोनशी ब्लुटूथ अथवा इतर कोणत्याही प्रकारे जोडली असण्याची गरज नाही
५. एखाद्या Emergency च्या घटनेनंतरही तुमच्या कुटुंबियांना अथवा एखाद्या Emergency Service ला संदेश देऊ शकते.

Scan2Save हि QR Code वर आधारित Online Emergency ID सेवा आहे.

या प्रोजेक्टमागचा विचार असा आहे कि, कोणत्याही इमर्जन्सी मध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीजवळ असणारे QR कोड वर आधारित एखादे स्टिकर स्कॅन होणे आणि त्या व्यक्तीला योग्य वेळी वैद्यकीय अथवा इतर कोणतीही मदत मिळणे व परिणामी त्या व्यक्तीचा जीव वाचणे हे ‘Internet Of Things- IoT’ च्या मदतीने करण्यापेक्षा ‘Internet Of People- IoP’ च्या माध्यमातून जास्त परिणामकारक होऊ शकते. इंटरनेट च्या महाजालाची ताकत परिणामकारकपणे वापरणारा लोकसमूह म्हणजे ‘Internet Of People- IoP’.

Scan2Save Online Emergency ID Kit मध्ये तुम्हाला काय मिळेल?
१. तुमचा स्वतःचा, वैद्यकीय व इतर महत्वाची माहिती साठवलेला QR Code. जो कायमस्वरूपी तुमच्या Online Emergency ID प्रोफाईल शी जोडलेला असेल.
२. पाणी रोधक, न फाटणाऱ्या कागदापासून बनवलेल्या QR Code स्टिकर चा संच
३. उच्च दर्जाचे ATM Card सारखे QR Code चे कार्ड जे तुम्ही पाकिटात ठेवू शकता
४. QR Code ची कीचेन जी तुम्ही गाडीच्या, घराच्या किल्ल्यांनां जोडू शकता

तुम्ही तुमची Online Emergency ID प्रोफाईल तयार आणि ऍक्टिव्हेट करु शकता आणि तुम्हाला मिळालेली स्टिकर्स हेल्मेट , मोबाईल फ़ोन चे कव्हर , चार चाकीची पुढची काच किंवा मुलांच्या स्कुल बॅग , डबे इत्यादी सहज हाताशी असणाऱ्या वस्तूंवर लावू शकता.

दुर्दैवाने एखादी इमर्जन्सी आल्यास तुमच्या आजूबाजूचे कोणीही तुमच्या कडे असणारा QR Code स्कॅन करु शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबियांना अथवा एखाद्या Emergency Service ला संदेश जातो आणि तुमचे त्यावेळचे बिनचूक ठिकाणही गूगल मॅप वरून सांगितले जाते आणि या साठी कोणत्याही विशिष्ठ QR Code रीडर ऍप ची गरज नाही. गुगल प्ले स्टोर अथवा ऍपल स्टोर वर उपलब्ध कोणताही QR Code रीडर ऍप चालतो.

इमर्जन्सीमध्ये असणाऱ्या व्यक्तीची बिनचूक माहिती मदत करणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे आणि कुटुंबियांना गूगल मॅप वरून ठिकाण कळल्यामुळे,त्या व्यक्तीला वेळेवर योग्य मदत मिळून पुढील धोका टळू शकतो आणि वेळप्रसंगी प्राणही वाचू शकतात.

अधिक माहिती साठी http://www.weqr.in ला भेट द्या

Win a Scan2Save kit today!
https://widget-prime.rafflecopter.com/launch.js

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s